Friday 12 February 2016

अर्थविरहिन विचार

मी  हरवलेला नाही. सापडलेला तर मुळातच नाही. माझं सत्व तपासून पाहिण्याची संधी मी स्वतःला कधी दिली नाही. स्वतःला स्वतःची भिती वाटू शकते का? वाटली तरी स्वतःला पटवून देण्याची क्षमता कोणत्याही मनुष्यात असते का?
स्वतः कडून कधीच काही अपेक्षा नव्हत्या. होत्या त्या जमीनदोस्त कधी झाल्या कळू शकला नाही. किंवा मला सगळा कळत होतं पण जाणून बुजून कधी समजू शकलो नाही. असही असेल! मी कदाचित खूप भित्रा आहे. मी कदाचित सत्वाच्या गोष्टी करण्यात अस्तित्वाला गमावून बसलो. उम्मेद या रात्रीच्या अंधारात लपून बसावी तशी माझ्या आयुष्या पासून असणारी आशा गडप झाली आहेत.
उजेड असो वा अंधार, स्पर्श केवळ अशक्य. प्रकाशात किंवा प्रकाशाला  एकरूप व्हावं परिस्थितीशी का होता येत नाही?
फुलपाखरांचा तो मुक्ताविहार, वृक्षाची ती निस्वार्थ माया, काजव्यांचा तो लखलखता आत्मविश्वास, आभाळाची अपार सीमा, चंद्राचा शीतल प्रकाश, आसक्त वाटांची त्रस्त वळणे, हरवलेले विचार, तुटलेली स्वप्नं, निरागसता,अश्रूंचा अर्थ अमी हास्याचे कारण, या विचारांची जळमट्ट मोडक्या आणि मोजक्या अश्या आयुष्याच्या पासाऱ्याचं कारण का बनतात.   
एखाद्यानी मरावं कारण जगता येत नाही कि जगावं कारण मरता येत नाही. मृत्युच्या भितीला आयुष्याची उपमा द्यावी कि जगण्याच्या इच्छेला मृत्यूची भिती म्हणावी. 

1 comment:

  1. छान लिहिलं आहेस, 8 dec ला आपण भेटलो तुला आठवणार नाही. भेटू पुन्हा प्रसाद हॉटेल मध्ये, नरेंद्र 9619898540

    ReplyDelete